आरोग्यरहस्य लेखमाला ८
आरोग्यरहस्य लेखमाला ८
आता आपण पाहू, गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? म्हणजे हे पचायला जड की हलकं एवढा बारीक-सारीक विचार कोणी करावा?
मंदकर्मी –
सावकाश हालचाली करणार्या व्यक्ती (🐌गोगलगाय कॅरॅक्टर)
उदा. ज्यांना वेळेत कोठेही पोहोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत.
‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ🚿, शौचविधी व कपडे घालून 🤷♂ आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लाॅजिकली सांगायचे झाले तर, ज्यांना घड्याळ ⏰ काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.
मंदाग्नि –
ज्यांना योग्य वेळी भूक लागत नाही, किंवा खाल्लेले वेळेवर पचत नाही. 😕
अनारोग्यी –
रोगावस्थेत 🤕🤒 किंवा जे सतत येन-केन प्रकारे आजारी असतात. थोडक्यात ज्यांची गाडी 💊💉🌡 सारखी गॅरेजला 🚑🏥👨⚕ लागते अशी मंडळी.
सुकुमार –
म्हणजे कोमल प्रकृतीचे. 😊
सुखोचित –
सुखी 📱💻💰💎🛁🧖♂ व आरामदायी जीवन जगणारे ,
उदा. ज्यांचा प्रवास AC घरातून 🏨🏬 AC कारमध्ये 🚘 व AC कारमधून 🚘 AC ऑफिस 🏣💺 मध्ये असा उभयमार्गी चालू असतो असे सुखजीवी. म्हणजेच उपरोक्त व्यक्तींनी आपला आहार गुरु (पचायला जड) नसावा याची काळजी घ्यावी!
—————————————————————————————————————————
डाॅ.मंगेश देसाई
आयुर्वेदाचार्य
योग व संमोहन उपचार तज्ञ
For regular updates, like and follow: