आरोग्यरहस्य लेखमाला ६
मित्रहो, जेवणाबरोबरच जेवणाचे ठिकाण कसे असावे याचा सुध्दा विचार करणे तितकेच महत्वाचे असते. चला तर मग आज आपण भोजन स्थान या विषयाबद्दल थोडे जाणून घेऊ!
भोजनस्थान हे खालील गुणांनी युक्त असावे –
विजन :-
जेथे लोकांची जास्त वर्दळ नसेल असे ठिकाण भोजनासाठी योग्य असते, कारण अन्न 🍚🍲 व पाणी 🍶 यावर आपल्यावर 😡 द्वेष करणार्यांच्या दुष्ट भावनांचाही परिणाम होत असतो. तसेच आपण जेवत असताना कोणीतरी अचानक खाकरुन कफाचा बेडका 🤤 काढत असतो असे महाभाग तुम्हालाही
हाॅटेलात 🍽 दिसले असतील ज्यांना अजिबात सोसायटी 👨👨👧👦 मॅनर्स नसतात!
रम्य :-
निसर्गरम्य 🌳🎋🌾⛅ वातावरणात जेवणाची 🍛🍲 मजा काही औरच असते नि शेतात 🌱🌾🎋 कष्ट करुन सुर्य 🌤 डोक्यावर आल्यावर 🌳 झाडाखाली विसावा ⛺ घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच 😋 जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या 🌷🍀☘🌿🌱 बागेत जेवताना जेवणाचा स्वाद 😋 खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते. पण ही बाग म्हणजे माॅडर्न अॅमिनीटीज मधली 🏡 नकली प्लास्टिकच्या हिरवळीचा गालिचा व शोभेच्या वनस्पती 🌲 व झुडुपांपासून बनवलेली नसावी बरं!
नि:सम्पात :-
जेवणाची जागा वरून झाकलेली ⛱ असल्यास उत्तम व 😺 मांजर वगैरे अचानक ताटातून काही उचलून नेणार नाही असे नि:शंक असावे.
पवित्र :-
जेथे कोणतेही कुकर्म होत नाही किंवा यापूर्वी झालेले नाही असे ठिकाण योग्य. कत्तलखाना, स्मशानभूमी, पूर्वी कोणाची हत्या झाली आहे किंवा कोणी आत्महत्या केली आहे अशी ठिकाणे वर्ज्य करावीत.
शुचि :-
जेवणाची जागा स्वच्छ असल्यास मन प्रसन्न 😊 राहते व अन्नावर छान रुची 😋 उत्पन्न होते.
सुगन्धपुष्परचित :-
दिवाळीत 🎆 दारात 🎑 रांगोळी व सुगन्धिपुष्पांनी 🌷💐🌸🌺🌼🌻 सजवलेली आरास नि पणत्या लावलेल्या असताना जेवायला छान वाटते ना!
सम देश :-
समतल जमिनीवर 🏕 न अवघडता व्यवस्थित जेवणाचा आनंद घेता येतो अन्यथा खडकाळ जमिनीवर पोतं / तरटं /सतरंजी इ. अंथरुन पंगतीत जेवणाचा अनुभव एव्हाना तुम्ही घेतला असेलच की!
डाॅ.मंगेश देसाई
आयुर्वेदाचार्य
योग व संमोहन उपचार तज्ञ, पुणे.
For regular updates, like and follow: